काळाप्रमाणे गोष्टी कितीही बदलल्या तरी आनंदी जीवनासाठी निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा आणि ऐसपैस घर या गोष्टींना पर्याय नाही आणि हे घर कुटुंबातील सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारं असलं पाहिजे.
शुभम तारांगण फेज- २ मधील अपार्टमेंट्स म्हणजे स्वप्नवत जीवनशैलीला सत्यात उतरवणारी आलिशान घरं. आळेफाट्यातील आणि नारायणगांवाजवळील निसर्गरम्य परिसर, शुद्ध हवा येथील जीवनाला एक नवीन अर्थ देतात. प्रोजेक्टमधील १, २ BHK आणि जोडी फ्लॅट्स अतिशय आलिशान आणि मोठ्या कार्पेट एरियाचे आहेत. तसेच येथील ॲमेनिटीज आधुनिक जीवनशैलीच्या गरजांना पूर्ण करतात.
लहान, मोठे, आणि तरुण असे सगळेच रमतील आणि आनंदी जीवन जगतील अशी समृद्ध कम्युनिटी लाइफस्टाइल येथे आहे. आधुनिक सोयीसुविधा देणारं पण तितक्याच आपुलकीने पारंपरिक जगण्याला जपणारं प्रोजेक्ट म्हणजे शुभम तारांगण. एका उत्तम जीवनशैलीसाठी हेच तर हवं होतं…
नमस्कार, माझे मूळ गाव राजुरी हे असून माझे संपूर्ण आयुष्य नोकरी निमित्त मुंबई या ठिकाणी गेले. सन २०१६ साली मूळ गावापासून जवळच असलेल्या आळेफाटा या ठिकाणी सुरू असलेल्या शुभम तारांगण या प्रकल्पामध्ये सेकंड होम म्हणून मी २ बीएचके फ्लॅट बुक केला. घर घेत असताना बिल्डरने दिलेल्या सुख सुविधा आणि सर्व प्रीमियम अॅमिनिटीज मला आवडल्या. परंतु वास्तवात ज्यावेळेस मला ताबा देण्यात आला त्यावेळेस मी भारावून गेलो, कारण मला त्यानंतर समजले की या प्रकल्पाला इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल यांच्याकडून प्लॅटिनम रेटिंग हा मान मिळाला आहे. मुळातच मला निसर्ग सानिध्याची खूप आवड असल्यामुळे येथील हिरवळ, झाडी, जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, विद्युत ऊर्जा प्रकल्प इत्यादी पर्यावरणाला पोषक व पूरक अशा सुविधा पाहून मी समाधानी झालो. गेली सात वर्षे मी येथे राहत असून ताबा घेते वेळेस जशा सुविधा दिल्या होत्या तशाच आजही सुस्थितीत आहेत याचा मला खूप आनंद वाटतो.
नमस्कार, मी गेले पाच वर्षं शुभम तारांगण परिवारात राहत असून वास्तूची अंतर्गत रचना मला खूप आवडली. तसेच येथे देण्यात आलेल्या ओपन जिम, क्लब हाऊस, प्ले ग्राउंड, बॅडमिंटन व हॉलीबॉल कोर्ट, गजेबो सीट आऊट, वॉकिंग ट्रॅक इत्यादी सुविधा मला खूप आवडल्या. तसेच या प्रकल्पामध्ये विविध क्षेत्रातील सुविद्य व सुसंस्कृत लोक राहत असून आमचा जणू एक परिवारच बनला आहे. यामुळे या प्रकल्पामध्ये मला राहायला आवडते. धन्यवाद
नमस्ते मी सात वर्षांपासून शुभम तारांगण मधील 'रो हाऊस' मध्ये कुटुंबासोबत राहत आहे. इथे रो हाऊस घेण्याचे कारण म्हणजे पूर्ण प्रकल्पाला आर.सी.सी सुरक्षा भिंत असून २४ बाय ७ काळ सुरक्षेची सुविधा, कॉमन एरियात सीसीटीव्ही कॅमेरे यामुळे लहान मुलांना व महिलांना सुरक्षित वातावरण लाभते. येथील स्वच्छता व लहान मुलांना खेळण्यासाठी असलेली भरपूर मोकळी जागा आणि प्रकल्पात असलेल्या अत्याधुनिक सुख सुविधा यामुळे येथे राहायला आम्हाला प्रचंड आवडते. धन्यवाद.
नमस्कार मी गेले ७ वर्षांपासून शुभम तारांगण सोसायटीत राहात असून येथे राहण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील सुरक्षा व्यवस्था अतिशय चांगली आहे. त्यामुळे माझ्या मुलांना येथे मनमोकळेपणाने खेळता येते. माझ्या घरच्यांना गार्डनमध्ये फिरता येते. सोसायटीमधील लोकांना भेटता येते. येथे साजरे होणारे विविध कार्यक्रम मला अनुभवता येतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येथील अत्याधुनिक सुखसुविधा मला अनुभवता येतात. त्यामुळेच मला शुभम तारांगण प्रकल्पामध्ये राहायला आवडते.